दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ सप्टेंबर २०१९: निवडणुकीची घोषणा ते Gully Boyची 'ऑस्कर'वारी

Headlines of the 21 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर.

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ सप्टेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रासोबतच हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दुसरी बातमी आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या संदर्भातील. निवडणूक आयोगाने सातारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणाच केली नाही. तिसरी बातमी आहे शरद पवारांनी आगामी निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्याची. चौथी बातमी आहे पबजी गेमच्या आहारी गेलेला तरुण बेपत्ता झाल्याची, ही घटना मुंबई जवळ असलेल्या नवी मुंबईत घडली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे, बॉलिवूड सिनेमा गली बॉयच्या 'ऑस्कर'वारीची.

  1. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.  
  2. उदयनराजेंना धक्का: राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकून खासदार झालेल्या उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, तसे झालं नाही. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. ... तर महाराष्ट्रात सत्तांतर अटळ: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत एक मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील भाजप सरकारविरोधात जनतेमध्ये नाराजी आहे आणि पुन्हा पुलवामा हल्ल्यासारखी घटना घडली नाही तर राज्यात सत्तांतर अटळ आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. PUBG खेळणारा तरुण अचानक बेपत्ता: पबजी या ऑनलाईन गेमचं वेड लागलेला तरुण अचानक घरातून बेपत्ता झाला आहे. हा तरुण १६ वर्षांचा असन तो नवी मुंबईतील नेरुळ भागात राहत होता. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. रणवीर सिंग आणि आलियाच्या Gully Boyची 'ऑस्कर'वारी: झोया अख्तर यांच्या गली बॉय या सिनेमाला ऑस्कर फिल्म अवॉर्ड्ससाठी भारताकडून अधिकृतरित्या नामांकित करण्यात आलं आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका केली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी