दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ ऑगस्ट २०१९: राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी ते अजित पवार अडचणीत

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भातील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावलं. यानंतर राज ठाकरे सकाळीच ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल आठ तास चौकशी केली. दुसरी बातमी आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या मेसेजच्या संदर्भातील. अंजली दमानिया यांनी गुरुवारी सकाळी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास एक मेसेज पाठवला. तिसरी बातमी आहे पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याची संपत्ती ईडीने जप्त केल्याच्या संदर्भातील. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्ती चिदंबरमची परदेशातील संपत्ती जप्त केली आहे आणि त्याचे फोटोज, व्हिडिओज टाइम्स नाऊच्या हाती लागले आहेत. चौथी बातमी आहे सोन्याच्या दरात होत असलेल्या दरवाढीच्या संदर्भातील आणि पाचवी बातमी आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यासंदर्भातील.

  1. राज ठाकरेंची साडे आठ तास ईडीकडून चौकशी: कोहिनूर मिल प्रकरणात ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे गुरुवारी सकाळीच ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यही उपस्थित होते. राज ठाकरे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडे आठ तास चौकशी केली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. टीका केल्यानंतर अंजली दामानियांनी राज ठाकरेंना पाठवला 'हा' मेसेज: ईडीने चौकशीसाठी बोलवल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत दिसून आले. यावरुन अंजली दमानिया यांनी चौकशीसाठी जात आहेत की सत्यनारायणाच्या पुजेला अशी बोचरी टीका केली. त्यांतर रात्रीच्या सुमारास अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंना एक मेसेज पाठवला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. [EXCLUSIVE]: कार्ती चिदंबरमची परदेशातील संपत्ती जप्त: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर याच प्रकरणात त्यांचा मुलगा कार्ती याची परदेशातील संपत्ती ईडीने जप्त केली असल्याचे काही एक्सक्लूझिव्ह फोटोज आणि व्हिडिओज टाइम्स नाऊच्या हाती लागले आहेत. सविस्तर बातमी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक: सोन्याच्या दरात होणारी वाढ आजही कायम असल्याचं पहायला मिळालं. गुरुवारी सोन्याच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. केवळ सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ६० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सोनं ३९,००० रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असंही न्यायालयाने सांगितलं आहे. सविसतर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ ऑगस्ट २०१९: राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी ते अजित पवार अडचणीत Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी