दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ मे २०२०: RBIने केल्या महत्वाच्या घोषणा ते विमान कोसळले 

Headlines of the 22 may 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ मे २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... लॉकडाऊनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. दुसरी बातमी आहे कोरोना व्हायरसला आळा घालणाऱ्या औषधाच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. तिसरी बातमी आहे रेल्वेचं रिझर्व्हेशन आता काऊंटरवर होणार असल्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे सीआयएससीई बोर्डाने आपल्या दहावी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे पाकिस्तानात झालेल्या विमान अपघाताची.

  1. रिझर्व्ह बँकेच्या घोषणा: लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला दिलासा आणि चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत अनेक घोषणा केल्या आहेत. आरबीआयने यावेळी कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. कोरोनाला आळा घालणाऱ्या औषधाची विक्री: बांगलादेशमधील बेक्सिमको फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीने कोरोना व्हायरला आळा घालणारं औषध बनवल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर या औषधाच्या विक्रीला सुद्धा सुरूवात करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. आता रिझर्व्हेशन काऊंटर होणार रेल्वे आरक्षण: रेल्वेने निर्णय घेतला आहे की, काऊंटरवरुनही आता कितीट बुक केले जाऊ शकते याची सुरूवात आजपासून म्हणजेच २२ मे २०२० पासून सुरू करण्यात आळी आहे. यापूर्वी केवळ ऑनलाइन बुक करण्याची परवानगी होती. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. CISCE बोर्डाच्या दहावी-१२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक: काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्स म्हणजेच आयसीएससीई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. पाकिस्तानात विमान कोसळले: पाकिस्तानात एक मोठा अपघात झाला आहे. पाकिस्तान एअरलाईन्सचे एक विमान कराचीत कोसळले आहे. या विमानात एकूण पाच क्रू मेंबर्स आणि ९१ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी