दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ सप्टेंबर २०१९: 'हाऊडी मोदी' ते मराठमोळ्या राहुलने घडवला इतिहास

Headlines of the 22 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर.

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ सप्टेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या संदर्भातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हाऊडी मोदी कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दुसरी बातमी आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी गोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक मोठं वक्तव्य केलं आहे. तिसरी बातमी आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद कलीमुद्दीन मुजाहिरी याला अटक केल्याच्यासंदर्भातील. चौथी बातमी आहे ठाण्यातून दुर्मिळ रक्तचंदनाचा तब्बल १५ कोटी रुपये किंमत असलेला साठा जप्त केल्याची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे मराठमोळ्या राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची.

  1. अमेरिकेत 'हाऊडी मोदी': पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हाऊडी मोदी कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अमेरिकेतील ह्यूस्टन येथील एनआरजी फूटबॉल स्टेडियमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी ५०,००० हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. अमित शहा यांचं मोठं वक्तव्य: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोरेगाव येथील एका कार्यक्रमात भाषण करताना मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त करत पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असं ही म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक: अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य असलेल्या दहशतवादी मोहम्मद कलीमुद्दीन मुजाहिरी याला झारखंड एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. झारखंडमधील जमशेदपूर रेल्वे स्टेशनजवळून त्याला अटक केलीय. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. दुर्मिळ रक्तचंदनाचा साठा जप्त: ठाण्यातील घोडबंदर रोड आणि मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील गोदामातून दुर्मिळ रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या रक्तचंदनाची किंमत सुमारे १५ कोटी रुपयांहून अधिक आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. महाराष्ट्राच्या राहुल आवारेने रचला इतिहास: भारतीय पैलवान राहुल आवारे याने जागतिक सुक्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. रविवारी ६१ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत राहुल आवारे याने अमेरिकेच्या टेलर ली ग्राफ याचा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी