दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ एप्रिल २०२०: राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र ते WHO प्रमुखांचा इशारा

Headlines of the 23 April 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 23 april 2020 big headline jabardast 5 news day ajit pawar railway raj thackeray cm kolhapur plasma therapy cororna virus who mumbai police
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ एप्रिल २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भात. दुसरी बातमी आहे कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत.

तिसरी बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. चौथी बातमी आहे कोरोना इलाजासंदर्भात कोल्हापुरात होणार पहिला प्रयोग. पाचवी आणि शेवटची बातमी आहे परदेशी महिलेचे पैसे संपल्यावर पोलिसाने मदत केली पण केली विचित्र मागणी.

  1. राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरेंनी राज्याच्या घटत्या महसुलाबाबत भाष्य करताना काही सल्ले दिले आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. कोरोनाबाबत WHO प्रमुखांचा इशारा: जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पुन्हा एकदा जगाला धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना संकट माणसाला दीर्घकाळ सतावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. अजित पवारांचं रेल्वेमंत्र्यांना पत्र: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल याना पत्र लिहून परप्रांतीय मजूर बांधवांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली आहे. तसेच त्यासाठी आधीच नियोजन करावे असंही म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. कोरोना इलाजासंदर्भात कोल्हापुरात पहिला प्रयोग होणार: कोरोना संदर्भात कोल्हापुरात एक प्रयोग होणार आहे. गंभीर, अत्यवस्थ कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. परदेशी महिलेला पोलिसाने केली मदत पण...: मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्यावर कोलिंबियाच्या एका महिलेला त्रास दिल्याचा आणि चुकीचे मेसेज पाठवल्याचा, लैंगिक गैरवर्तवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी