दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ एप्रिल २०१९: पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद ते पुन्हा राज गर्जना

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 24, 2019 | 22:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

whole day news 24 april 2019 big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील पहिली बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर पाच वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणार आहेत. किधी, कुठे आणि किती वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ही पत्रकार परिषद घेणार आहेत हे पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. दिवसभरात दुसरी चर्चेत असलेली बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने घेतलेली मुलाखत. तिसरी बातमी आहे वाढत्या तापमानाची. राज्यात येत्या काळात तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चौथी बातमी आहे, राज ठाकरे यांची भांडूप येथे झालेल्या जाहीर सभेची आणि पाचवी बातमी दिल्लीतून आहे. उत्तरप्रदेश-उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. 

  1. पाच वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणार आहेत. येत्या २६ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर वाराणसीतच ते पत्रकार परिषद घेणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हलकीफुलकी मुलाखत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने घेतली आहे. या मुलाखतीत खिलाडी अक्षय कुमारने कुठले प्रश्न विचारले आणि त्यावर मोदींनी कशा प्रकारे उत्तरे दिली हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. राज्यात उष्णतेची लाट: राज्यातील विविध भागांत सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भागांत हवामान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. मुंबईत पुन्हा राज गर्जना: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील भांडुप परिसरात जाहीर सभा घेतली. आपल्या या सभेतही राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. या सभेतही राज ठाकरे यांनी 'ए लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप सरकारची पोल खोल केली. राज ठाकरेंची संपूर्ण सभा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. रोहितच्या हत्येनंतर पत्नीने ९० मिनिटांत नष्ट केले पुरावे: उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याच्या हत्ये प्रकरणी पदिल्ली पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली आहे. रोहितच्या पत्नीला अटक केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे आणि ती म्हणजे त्या्चया पत्नीने हत्येनंतर ९० मिनिटांत पुरावे नष्ट केले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ एप्रिल २०१९: पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद ते पुन्हा राज गर्जना Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...