दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ मार्च २०२०: देशात २१ दिवस लॉकडाऊन ते काय बंद, काय सुरु?  

Headlines of the 24 March 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 24 march 2020 big headline coronavirus india lockdown pm modi food rajesh tope hantavirus atm latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ मार्च २०२०:  देशात २१ दिवस लॉकडाऊन ते काय बंद, काय सुरु?    |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ मार्च २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... आजपासून संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा केली आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे देशात लॉकडाऊन असलं तरी यावेळी काय सुरु असणार आणि काय बंद असणार हे जाणू घेणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाचं आवाहन जनतेला केलं आहे. 
 
तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोना पाठोपाठ चीनमध्ये आता एका नवा व्हायरस सापडला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन: मोदी: आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यूच आहे. असं पंतप्रधान मोदी यांनी आज जाहीर केलं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. देशात लॉकडाऊन काय सुरु, काय बंद... फक्त एका क्लिकवर: देशात यापुढे २१ दिवस लॉकडाऊन असणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे. पण यामुळे अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे की, या लॉकडाऊनमध्ये देशात नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु असणार आणि कोणत्या गोष्टी बंद राहणार? सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले ४ महत्त्वाची आवाहने: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपे यांनी नागरिकांना काही आवाहनं केली आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. चीनमध्ये आता आणखी एक नवीन व्हायरस, 'Hantavirus'मुळे एकाचा मृत्यू, जाणून घ्या याचे लक्षणं: चीनमध्ये आता एक नवा व्हायरस समोर आलं आहे. त्याचं नाव 'हंता व्हायरस' (Hantavirus) असं आहे. चीनच्या युन्नान प्रांतात याच हंता व्हायरसमुळे एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार, शुल्क लागणार नाही!: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी नागरिकांना दिलासा देणारे निर्णयही अर्थमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...