दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ मार्च २०२०: महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले ते पोलिसांची जवानाला मारहाण

Headlines of the 25 March 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 25 march 2020 big headline coronavirus maharashtra patient pune discharged ac uddhav thackeray drawing viral jawan latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ मार्च २०२०: महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले ते पोलिसांची जवानाला मारहाण   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ मार्च २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... महाराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. सांगलीत एकाच कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पुण्यातील ज्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. ते दाम्पत्य आता पूर्णपणे बरं झालं असून आज त्यांना घरीही सोडण्यात आलं आहे. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर घरात एसीची वापर करु नये. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 
  
तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव सुरु असताना लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी एका शाळकरी मुलीने काढलेलं चित्र सध्या बरंच व्हायरल होत आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे संचारबंदी दरम्यान घराबाहेर उभ्या असलेल्या एका लष्कराच्या जवानालाच पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर

  1. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण:  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  सांगलीतल्या इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. गुढीपाडव्यादिवशी पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 'त्या' दाम्पत्याला मिळाला डिस्चार्ज:  जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. देशभरासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पण त्यातच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. 'कोरोनाशी सामना करायचाय असेल तर  AC वापरु नका': मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना एसी म्हणजेच एअर कंडिशनर (एसी) न वापरण्यास सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी एक उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना आवाहन केले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना विद्यार्थीनीची चित्रातून भावनिक साद, चित्र होतंय व्हायरल: लोकांना विनाकारण बाहेर न जाता घरी राहण्याची भावनिक साद एका चित्राच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीने घातली आहे. हे चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी आपल्या फेसबूक, व्हॉट्सअॅप स्टेटसवरही हा फोटो ठेवला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. पोलिसांकडून लष्करातील जवानालाच मारहाण, आपण नेमके चुकतोय कुठे?: कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना आता पोलिसांनी एका लष्कराच्या जवानालाच मारहाण केल्याचं समोर आलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी