दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ फेब्रुवारी २०२०: धुमसती दिल्ली ते २००० च्या नोटेविषयी मोठी बातमी 

Headlines of the 26 February 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 26 February 2020 big headline delhi violence death bank money savarkars glory proposal marathi language 2000 rs note latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ फेब्रुवारी २०२०: धुमसती दिल्ली ते २००० च्या नोटेविषयी मोठी बातमी   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ फेब्रुवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत आता हिंसक आंदोलन सुरु झालं असून यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे  १ मार्चपासून नवे आर्थिक बदल होणार आहेत. मार्च २०२०मध्ये ५ मोठे नियम बदलणार आहेत. विशेष म्हणजे जर SBI बँकमध्ये आपलं खातं असेल तर आपल्यावर सुद्धा काही परिणाम होऊ शकतात. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी आज विधानसभेत केली. पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. यावरुन विरोधकांनी बराच गोंधळ घातला. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे यापुढे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय हा अनिवार्य असणार आहे. यासंबंधीचं विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर देखील करण्यात आलं. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे २००० रुपयांच्या नोटा बंद होणार का? अशी जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. धुमसती दिल्ली, हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू, शूट अॅट साईटचे आदेश: गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली धूमसताना दिसत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन (सीएए) दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात हिंसाचारात हेड कॉन्स्टेबलसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. सर्व बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, मार्चमध्ये बदलतील बँक खाते आणि ATM सह हे ५ नियम:  नवीन आर्थिक वर्षात अनेक नवीन बदल झालेले आपल्याला बघायला मिळणार आहेत. सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक बदल १ मार्चपासून होणार आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, गौरव प्रस्ताव विधानसभेत फेटाळला: स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन विधानसभेत आज गदारोळ पाहायला मिळाला. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. 'पहिली ते दहावी सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य', शिवसेना मंत्र्याने दिली माहिती: राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे मराठी भाषा हा विषय अनिवार्य असणार आहे. मराठी राजभाषा दिनाच्या एक दिवस आधी विधानपरिषदेत याबबातचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. २००० च्या नोटेविषयी मोठी बातमी, ATM मध्ये केले जात आहेत बदल: २००० रुपयांची नोट चलनातून बंद होईल का? असा प्रश्न बर्‍याचदा विचारला जातो. यावर सरकारने अनेकदा  स्पष्ट देखील केलं आहे की, असं काहीही होणार नाही. पण आता पुन्हा एकदा तोच प्रश्न समोर आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...