दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ जानेवारी २०२०: टीम इंडियाकडून प्रजासत्ताक दिनाचं गिफ्ट ते राजपथावर पथसंचलन

Headlines of the 26 January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राजपथावर शानदार पथसंचलन करण्यात आले. दुसरी बातमी आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोन शहरात तीन बॉम्बस्फोट झाल्याची. तिसरी बातमी आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची. चौथी बातमी आहे टीम इंडियाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठं गिफ्ट दिल्याची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्याची कामगाराला मारहाण.

  1. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, राजपथावर पथसंचलन: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील राजपथवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानंतर राजपथावर पथसंचलन पाहायला मिळाले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. प्रजासत्ताक दिनी तीन बॉम्बस्फोट: प्रजासत्ताक दिनी आसामच्या डिब्रुगढ शहरात दोन तर चराईदेव येथे एक असे एकूण तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. एक स्फोट हा गुरुद्वाराजवळ थर दुसरा बॉम्बस्फोट हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ जवळ झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. काँग्रेस कार्यालयात राडा, दोन नेत्यांमध्ये हाणामारी: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातच काँग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. टीम इंडियाकडून प्रजासत्ताक दिनाचं मोठं गिफ्ट: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्याची कामगाराला मारहाण: पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी इंडियन ऑइल कंपनीच्या कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी