दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ मे २०२०: दहशतवाद्यांचा कट उधळला ते राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला

Headlines of the 28 may 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ मे २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा कट सैन्य दलाने उधळला आहे. दुसरी बातमी आहे भारत-चीन सीमेवर तणाव आणखी वाढला आहे आणि चीनने आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणले आहे. तिसरी बातमी आहे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढला आहे. चौथी बातमी आहे कोरोनामुळे मुंबईतील १३ पोलीस आणि २५ मनपा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची राजभवनाला खर्चाला कात्री लावली आहे. 

  1. दहशतवाद्यांचा कट उधळला: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा कट भारतीय सैन्याने उधळवला आहे. यावेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका कारमधून आयईडी सुद्धा जप्त केला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. भारत-चीन सीमेवर तणाव: भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आहेत. चीनने मोठ्या संख्येने आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणले आहे. त्यासाठी त्यांनी युद्ध सरावात वापरली जाणारी मोठी वाहने, टिपर्स ट्रकची मदत घेतली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. कोरोना बाधितांचा आकडा वाढला: राज्यात आज २५९८ कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्यू ५९,५४६ इतकी झाली आहे. तर गुरुवारी राज्यात ८५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. कोरोनामुळे मुंबईत १३ पोलीस, २५ मनपा कर्मचाऱ्यांचा मृत्यू: कोरोनाचं संकट मुंबईवर कायम असल्याचं दिसत आहे. कोरोना संकटामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील १३ जणांचा आणि मुंबई महानगरपालिकेतील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. कोरोनामुळे खर्चाला कात्री: राज्यपालांनी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यटासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी