दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मे २०२०: कोरोना संकटात राज्याला मोठा दिलासा ते यंदा वारीची पायी दिंडी रद्द

Headlines of the 29 may 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मे २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... कोरोनाचं संकट असताना राज्याला एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दुसरी बातमी आहे यंदाच्या आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आल्याच्या संदर्भातील. तिसरी बातमी आहे राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरच राज्य सरकार एक आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. चौथी बातमी आहे न्यायाधीशांच्या बदल्या आणि गुजरातमध्ये रोस्टर बदल हा कथीत योगायोग चिंताजनक असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे प्रसिद्धी ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन झालं आहे.

  1. राज्याला मोठा दिलासा, आज विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त: कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे ७३५८ मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. यंदा आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द: यंदा कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती पाहता पायी पालखी सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुकांना राज्य शासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार: सध्याच्या उद्धभवलेल्या आर्थिक संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.  
  4. न्यायाधीशांच्या बदल्या आणि गुजरातमध्ये रोस्टर बदल हा कथीत योगायोग चिंताजनक: गेल्या सहा वर्षात अनेक न्यायाधीशांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या. यातील बहुतांश न्यायाधीस हे अत्यंत संवेदनशील प्रकरणे हाताळत होते किंवा दिलेले निवाडे आणि टिप्पण्या भाजपशासित सरकारच्या विरोधात होत्या. मात्र, या बदल्या रुटीन असल्याचं सांगितलं. पण हा तथाकथीत योगायोग चिंताजनक असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन: प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन झालं आहे. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बेजान दारूवाला यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी