दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ डिसेंबर २०१९: राष्ट्रवादीला भाजपचा पाठिंबा ते रेल्वेचं महागडं गिफ्ट

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 31, 2019 | 21:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 31 December 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ डिसेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. दुसरी बातमी आहे पुण्यात काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली आहे. तिसरी बातमी आहे 'पाकिस्तानशी दोन हात करण्यास सैन्यदल सक्षम' असं वक्तव्य भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांनी केले आहे. चौथी बातमी आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवल्याची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे भारतीय रेल्वेने तिकीट दरात वाढ केली आहे. 

  1. राष्ट्रवादीला भाजपचा पाठिंबा: उस्मानाबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. कारण, या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. मंत्रिपद न दिल्याने कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस भवनाची तोडफोड: ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. या मंत्रिमंडळात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना स्थान न मिळाल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवानाची तोडफोड केली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत म्हणाले...: लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे भारताचे पहिले सीडीएस बनले आहेत. देशाचे पहिले सीडीएस म्हणून १ जानेवारी २०२० रोजी ते आपल्या पदभार स्वीकारतील. पाकिस्तानशी दोन हात करण्यास सैन्यदल सक्षम आहे असं वक्तव्य बिपीन रावत यांनी केले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. पॅन-आधार लिंक करण्यास मुदतवाढ: आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता मार्च २०२० पर्यंत तुम्ही पॅन-आधार लिंक करु शकणार आहेत. यापूर्वी ही तारीख ३१ डिसेंबर २०१९ होती. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. नव्या वर्षात रेल्वेचं प्रवाशांना महागडं गिफ्ट: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय रेल्वेने आपल्या तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी