दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ ऑक्टोबर २०१९: उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर टीका ते सोन्याचा आजचा दर

Headlines of the 31 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 31 october 2019 big headline vidhansabha election 2019 uddhav thackeray shiv sena bjp manohar joshi devendra fadanvis congress gold rate latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. तर दुसरी महत्त्वाची बातमी सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट मनोहर जोशींनी केला आहे. तर तिसरी महत्वाची बातमी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार नसल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजपची चर्चा फिस्कटल्याची माहिती स्वत: उद्धव ठाकरेंकडून देण्यात आली आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे सोन्याच्या दरात आज वाढ झाली झाली आहे. पाहा काय आजचा सोन्याचा दर. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. 'कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आलेलं नाही', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला: शिवसेनेच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्याची चर्चा झाली, मनोहर जोशींचा गौप्यस्फोट: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'उद्धव ठाकरे यांची सत्तास्थापनेविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.' असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. शिवसेनेला 'हात' देण्यास सोनियांचा नकार, हे कारण...: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते उत्सुक असले तरी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी मात्र असा कोणताही पाठिंबा देण्यास उत्सुक नसल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. चर्चा फिसकटल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले खरे कारण:  मुख्यमंत्रीपद हा शब्द वाटाघाटीमध्ये नव्हता, हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करायला नको होते, मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर चर्चा फिसकटली. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, इतके रुपयांवर पोहचले सराफा बाजारातील भाव: जागतिक बाजारातील मजबुतीचा कलामुळे सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावात ११५ रुपयांची वाढ दिसून आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी