दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ५ नोव्हेंबर २०१९: भाजपची चर्चेची शेळी ते राऊतांची अखेरची अट

Headlines of the 5 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०५ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या संदर्भातील. राज्यात गेल्या १३ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता संघर्षात भाजपने शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी मास्टर प्लान आखला आहे. दुसरी बातमी आहे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या बाबत एक मोठा निर्णय झाला आहे. तसेच शिवसेनेच्या 'त्या' मागणीवर चर्चा करण्यास तयार आहे. तिसरी बातमी आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपसमोर एक अखेरची अट टाकल्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुणी विहिरीत पडली आणि तिला वाचवण्यासाठी तरुणाने विहिरीत उडी मारली. पाचवी आणि शेवटची बातमी आहे मुंबईतील, एका तरूणाने पार्टी केल्यानंतर नशेच्या धुंदीत आपल्याच मैत्रीणीवर बलात्कार केल्याची.

  1. शिवसेनेच्या वाघाला अडकवण्यासाठी भाजपची चर्चेच्या शेळीची खेळी: भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी मास्टर प्लान आखला आहे. शिवसेना चर्चेसाटी तयार असल्यास आणची दारं २४ तास खुली असल्याचं भाजपने म्हटलं आहे. या संदर्भातील सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. राऊतांनी टाकली भाजपला 'ही' अट: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या अडीच-अडीच वर्षांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच संजय राऊत यांनी एक अटही भाजपला टाकली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. शिवसेनेच्या 'त्या' मागणीवर चर्चा करण्यास भाजप तयार: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासही आम्ही तयार आहोत मात्र, शिवसेनेने प्रस्ताव घेऊन आमच्याकडे यावं आणि त्यानंतर शिवसेनेचा जो काही प्रस्ताव असेल त्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. साखरपुडा झालेलं कपल सेल्फीच्या नादात विहिरीत पडलं: सेल्फी घेण्याच्या नादात साखरपुडा झालेली तरुणी विहिरीत पडली आणि तिला वाचवण्यासाठी तरुणाने उडी मारली. या घटनेत तरुणाला वाचवण्यात यश अलं तर तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. पार्टीनंतर मित्रानेच केला महिलेवर बलात्कार: दारुच्या नशेत धुंद झालेल्या एका तरुणाने आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ५ नोव्हेंबर २०१९: भाजपची चर्चेची शेळी ते राऊतांची अखेरची अट Description: Headlines of the 5 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...