दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ६ जून २०२०: कोरोना संकटात दिलासादायक बातमी ते शिवराज्याभिषेकाचा उत्साह

Headlines of the 6 June 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ६ जून २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... कोरोना संकटात महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, शनिवारी राज्यातील २२३४ रुग्ण बरे होऊन घरी. दुसरी बातमी आहे भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तिसरी बातमी आहे कोरोना संकटातही शिवराज्याभिषेकाचा उत्साह कायम असल्याचं पहायला मिळालं. चौथी बातमी आहे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची खरेदी करणार असल्याची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे लॉकडाऊनमध्ये छगन भुजबळ यांच्या खात्याने विक्रम केल्याची. 

  1. दिलासादायक बातमी: आज २२३४ रुग्ण बरे होऊन घरी: राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. कोरोना संकटात महाराष्ट्राला मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. लष्करी अधिकाऱ्यांची बैठक संपली, LACवर तणाव कायम: भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातील सीमेवर सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी चर्चा केली. सकाळपासून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. कोरोना संकटातही शिवराज्याभिषेकाचा उत्साह कायम: छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. यंदा कोरोना संकटामुळे निवडक नागरिकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. नागरिकांनी सोशल मीडियात शिवाजी महाराजांशी संबंधित कहाण्या, फोटो, शिवरायांवरील कार्यक्रमाचे व्हिडिओ पोस्ट करायला सुरूवात केली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. राज्य सरकार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची खरेदी करणार: राज्य सरकारने रेमडेसिवीरचे इंजेक्शन्सच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. सार्स आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. छगन भुजबळांच्या खात्याने लॉकडाऊनमध्ये केला 'हा' विक्रम: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्य वाटपात विक्रम नोंदवला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी