दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ६ नोव्हेंबर २०१९: सत्तेसाठी दिल्लीत खलबतं ते भाजपची गोड बातमी राऊतांनी केली कडू

Headlines of the 6 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०६ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता स्थापनेसाठी होत असलेल्या मोठ्या घडामोडी. दिवसभरातील पहिली बातमी म्हणजे... शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट. दुसरी बातमी आहे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या दोघांत जवळपास एकतास चर्चा झाली. तिसरी बातमी आहे राज्यातील सत्ता संघर्षावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली. चौथी बातमी आहे भाजपच्या कोअर कमिटीची बुधवारी बैठक झाली आणि या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पाचवी आणि शेवटची बातमी आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे देणार असलेली गोड बातमी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उघड केल्याच्या संदर्भातील. 

  1. शिवसेना-राष्ट्रवादी खलबतं: शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट अवघ्या दहा मिनिटांची असली तरी या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. गडकरी आणि पटेल यांची चर्चा: काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकीर यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट जवळपास एक तासभर चालली. ही भेट राजकीय भेट नव्हती आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीच चर्चा झाली नाही असं अहमद पटेल यांनी सांगितलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. सत्ता संघर्षाबाबत मोदी शहा बैठक: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय ठरलं?: भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच गुरुवारी भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचंही ठरलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. सुधीर मुनगंटीवार कोणती गोड बातमी देणार?: भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वारंवार सांगत आङेत की तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल. सुधीर मुनगंटीवार यांच्या याच गोड बातमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपसाठी ही बातमी कडू केली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी