दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ७ नोव्हेंबर २०१९: संजय राऊत यांचं भाजपला चॅलेंज ते भाजपने उचचलं मोठं पाऊल

Headlines of the 7 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०७ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता संघर्ष सुरु असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एक चॅलेंज दिलं आहे. दुसरी बातमी आहे संजय राऊत यांनी मोदी शहा यांनी शिवसेनेत सामील होण्याचं वक्तव्य केल्याच्या संदर्भात. तिसरी बातमी आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपची माफी मागावी अशी मागणी केल्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली या भेटीत काय झालं याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पाचवी बातमी आहे सत्ता स्थापनेला एक दिवस असातना भाजपने उचललेल्या मोठ्या पावलाच्या संदर्भातील.

  1. संजय राऊतांनी भाजपला दिलं पुन्हा चॅलेंज: शिवसेना आमदारांची एक महत्वाची बैठक मातोश्री निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला पुन्हा चॅलेंज दिलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. ...तर मोदी-शहांनी शिवसेनेत सामील व्हावे - संजय राऊत: मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसैनिकच आहेत त्यामुळे शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री करावे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देत संजय राऊत यांनी म्हटलं, 'आम्ही पण अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना आपलं मानतो त्यामुळे ते उद्या शिवसेनेत दाखल होतील का?' सविसतर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. 'त्यासाठी संजय राऊत यांनी भाजपची माफी मागावी': सत्ता संघर्षात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी वाढताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपची मागावी अशी थेट मागणी भाजपने केली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. राज्यपालांना भेटल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले: राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळ लागल असतानाच गुरुवारी भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती करुन देण्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटण्यासाठी गेलो असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. सत्ता स्थापनेला एक दिवस असताना भाजपचं मोठं पाऊल: राज्यात सत्ता स्थापनेला काही तास शिल्लक असताना आता भारतीय जनता पक्षाने एक मोठं पाऊल उचललं आहे. भाजपने आपल्या सर्व १०५ आमदारांना आणि पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना मुबईत बोलावलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...