दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ९ जानेवारी २०२०: उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांसाठी बॅटिंग ते एसबीआयची खुशखबर

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 09, 2020 | 22:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 9 January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ९ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी आणि भूमीपूत्रांसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. दुसरी बातमी आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तिसरी बातमी आहे बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतासाजवळ रॉकेट हल्ला केल्याची. चौथी बातमी आहे एसबीआयने आपल्या गृहकर्जदारांना खुशखबर दिली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे एनसीआरबीने देशभरात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली असून ही खूपच धक्कादायक आहे. 

  1. उद्धव ठाकरेंची भमीपूत्र आणि शेतकऱ्यांसाठी जोरदार बॅटिंग: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील महाएक्स्पोत बोलताना शेतकरी आणि भूमिपूत्रांसाठी जोरदार बॅटिंग केली. आपल्यातील कौशल्य आणि बुद्धीमत्तेचा वापर करायला हवा. मेड इन इंडियाची भूरळ जगाला पडायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. मुंबई पोलिसांना मोठं यश, दाऊदच्या निकटवर्तीयाला अटक: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या डॉन एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमधील पाटणा विमानतळावर त्याला अटक केली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतासाजवळ रॉकेट हल्ला: इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा एकदा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेन दुतावासापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर एक क्षेपणास्त्र कोसळलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. गृहकर्जदारांसाठी एसबीआयची खुशखबर: बांधकाम सुरु असलेल्या गृह प्रकल्पांत घर खरेदी करणाऱ्या कर्जदाराला ठरलेल्या विळेत घराचा ताबा मिळाला नाही तर कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याचे बँकेने जाहीर केले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. २०१८ या वर्षातील गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी: राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एनसीआरबीने २०१८ साली भारतात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी