दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ९ मे २०२०: 'या' जिल्हात सुरु होणार बस ते आतापर्यंतचा रुग्णांचा आकडा

Headlines of the 9 May 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 9 may 2020 big headline osmanabad liquor mrp ied blast pakistan maldiv india patients latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ९ मे २०२०: 'या' जिल्हात सुरु होणार बस ते आतापर्यंतचा रुग्णांचा आकडा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ९ मे २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... राज्यातील एका मोठ्या जिल्ह्यात आता बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. कारण हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कर्नाटकमध्ये १७ मे पर्यंत एमआरपीनुसार दारुची विक्री केली जाणार आहे. तिसरी महत्वाची बातमी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आयईडी बॉम्बचा स्फोट झाला असून यात पाकिस्तानचे ६ सैनिक ठार झाले आहेत. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय नौसेनेची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका ६९८ भारतीयांना घेऊन मालदीववरुन निघाली आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे बरेच रुग्ण वाढले आहेत. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात सुरु होणार बस सेवा!:  गेल्या अनेक दिवसापासून उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे कोरोना संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती नाही. त्यामुळे जिल्ह्यात ११ मे पासून बस सेवा सुरू करण्यात येत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. १७ मे पर्यंत MRP नुसार दारू विक्री, 'या' राज्याने घेतला निर्णय: कर्नाटक राज्य सरकारने  १७ मे पर्यंत छापील किमतीनुसार दारू विक्रीसाठी क्लब, बार आणि रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. आयईडी बॉम्बस्फोटात पाकिस्तानच्या मेजरसह ६ सैनिकांचा मृत्यू: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आयईडी बॉम्बचा स्फोट झाला असून, या स्फोटात पाकिस्तानी लष्कराच्या मेजरसह ६ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. ६९८ भारतीयांना घेऊन आएएनएस 'जलाश्व' भारताच्या दिशेने रवाना: भारतीय नौसेनेची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका ६९८ भारतीयांना घेऊन मालदीववरुन निघाली आहे. तर ४५०० लोकांनीही भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढतेय, पाहा आतापर्यंतचा नेमका आकडा: देशात मागील २४ तासात तब्बल ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५९६६२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी