दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या,  २० एप्रिल २०१९: मोदींच्या वेबसीरिजवर बंदी ते हार्दिक, लोकेशला दंड

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 21:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

 divasabharatil 5 batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिकवर बंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांच्या आयुष्यावर आधारित वेबसीरीजवरही बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.दुसरी बातमी अशी आहे की उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरच्या मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे समोर आले आहे. तिसरी बातमी  शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. चौथी बातमी अशी की राज ठाकरे यांच्या सभांवरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हल्लाबोल केला आहे. पाचवी बातमी अशी की कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलला बीसीसीआयने प्रत्येकी २० लाखांचा दंड ठोठावला आहे. 

  1. पंतप्रधान मोदींच्या जीवनावरील वेब सीरिजवर बंदी, निवडणूक आयोगाची कारवाई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर आधारित वेब सीरिजवरही बंदी घातली आहे. याप्रकऱणी इरोस नाऊला एपिसोडची स्ट्रीमिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर बातमी एका क्लिकवर
  2. गळा, तोंड दाबून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची हत्या, पोलिसांकडून पत्नीची चौकशी- उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरच्या मृत्यूबाबत कसून तपास क्राईम ब्रांचकडून केला जात आहे. शेखर यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून हत्या असू शकते असे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालं  आहे. रोहित यांचा मृत्यू नाक, गळा आणि तोंड दाबल्यानं गुदमरून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  3. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूक आयोगाची नोटीस - शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरला भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीशीला त्यांना आता उत्तर द्यायचे आहे. त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. सविस्तर बातमी एका क्लिकवर
  4. राज ठाकरेंचा मत अधिकार सरकार काढतेय हा जावईशोध : विनोद तावडे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मदानाचा अधिकार सरकार काढून घेत असल्याचा जावईशोध असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी यावेळी राज ठाकरेंच्या भाषणावरूनही जोरदार टीका केली.  ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन आणि करमणुकीसाठी जातात असे लोकच सांगतात असल्याचे तावडे म्हणाले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  5. वर्ल्डकपआधी राहुल आणि पांड्याला BCCI चा झटका, चॅट शो प्रकरणात ‘ही’ शिक्षा - क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि बॅट्समन के. एल. राहुल यांना कॉफी विथ करण या कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीसीसीआयने प्रत्येकी २० लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. प्रत्येकी १ लाख रूपये १० शहीद जवानांच्या विधवांना आणि सोबतच १० लाख रुपये ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनला द्यावे, असे त्यांनी आदेश दिले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या,  २० एप्रिल २०१९: मोदींच्या वेबसीरिजवर बंदी ते हार्दिक, लोकेशला दंड Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 
Loading...
Loading...
Loading...