दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ एप्रिल २०१९: श्रीलंका बॉम्बस्फोट ते आर अश्विनला १२ लाखांचा दंड

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 21:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

 divasabharatil 5 batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात.  आज सकाळी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटानं हादरलं. एकामागोमाग एक असे ८ बॉम्बस्फोट श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झाले. या १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरी बातमी आहे राज ठाकरे यांची. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीसोबत हातमिळवळणी करणार अशी चर्चा होऊ लागली आहे. आता बातमी आहे सर्व प्रेक्षकांची लाडकी भाभीजी घर पर है ची अभिनेत्री सौम्या टंडननं  गरोदरपणानंतर वजन घटवण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. त्यानंतरची बातमी आहे सर्वांच लाडकं अॅप्लिकेशन इंस्टाग्रामची. इंस्टाग्राम सध्या नव्या फिचरवर काम करत आहे. यात लाईक्सशी निगडीत फिचर लवकरच लॉन्च होईल. पाचवी बातमी आहे. आयपीएल संदर्भातली यात किंग्स इलेव्हन पंजाबचा आर अश्विनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आर अश्विन हा आयपीएलमधला चौथा कॅप्टन आहे ज्याला दंड ठोठावण्यात आला आहे. 

  1. श्रीलंका बॉम्बस्फोटात १६० जणांचा मृत्यू, भारताकडून हेल्पलाइन सुरू :  श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आता मृतांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे आता भारताकडून तेथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. सविस्तर बातमी एका क्लिकवर. 
  2. विधानसभेत आघाडीसोबत मनसेचं इंजिन धावण्याची शक्यता: सध्या लोकसभा निवडणुकीचे प्रचार सभा जोरदार सुरू आहेत.  नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.  मात्र लोकसभानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे देखील आताच वाहू लागले आहेत.  राज ठाकरे विधानसभेत आघाडीसोबत हातमिळवणी करतील असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. भाबीजी सौम्याचा गरोदरपणानंतर वजन घटवण्याचा नवा फंडा: भाबीजी घर पर हैं या मालिकेतील अनिता अर्थात सौम्या टंडन सध्या गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करत आहे. त्यासाठी तिनं जीममधल्या ट्रेडमीलला कंटाळून एक नवाच फंडा स्वीकारलाय आणि चाहत्यांनाही तो सल्ला दिलाय. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. इंस्टाग्रामवर कमी लाईक्स येतात ? मग हे फिचर करेल तुम्हाला मदत: इंस्टाग्राम एक नवीन फिचरचं टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या मदतीनं यूजर्स आपल्या पोस्ट्सवर लाईक्सची संख्या लपवू शकतात. बघूया नेमकं हे फिचर कशा पद्धतीनं काम करेल. सविस्तर बातमी एका क्लिकवर.
  5. आर. अश्विनला १२ लाखांचा दंड; पण कशासाठी? : धिम्या गतीने गोलंदाजी केल्याचा फटका किंग्ज इलेव्हनचा कॅप्टन आर. अश्विनला बसला आहे. आयपीएलने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यंदाच्या सिझनमध्ये ही कारवाई झालेल्या अश्विन चौथा कॅप्टन आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा या लिंकवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ एप्रिल २०१९: श्रीलंका बॉम्बस्फोट ते आर अश्विनला १२ लाखांचा दंड Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...