दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ एप्रिल २०१९: संजय राऊतांची मुलाखत ते राहुल गांधीचा माफीनामा

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 22, 2019 | 21:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

leatest news1_Times Now
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ एप्रिल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: दिवसभरामध्ये आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी टाइम्स नाऊ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे श्रीलंकेमध्ये आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. 'चौकीदारच चोर आहे’ या वाक्यावरुन राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. तर भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भरसभेत विचारलेल्या एका प्रश्नावरुन आता वेगळंच राजकारण सुरू झालं आहे. या आणि यासारख्या अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या असल्यास करा फक्त एक क्लिक: 

 

  1. Exclusive मुलाखत:  'लाव रे तो व्हिडिओ' वर संजय राऊत यांचे रोखठोक मत: शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल टाइम्स नाऊ मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपले रोखठोक मत मांडले. टाइम्स नाऊ मराठीचे संपादक प्रशांत जाधवयांनी ही मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी सध्याची महाराष्ट्रातील स्थिती, चौकीदार, अफजलखान, युती, नरेंद्र मोदी, शिवसेनेची भूमिका,  राज ठाकरे, महाराष्ट्रातील युतीला मिळाणाऱ्या जागांचा अंदाज यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.  राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या अनोख्या प्रचार पद्धतीवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. VIDEO: श्रीलंका पुन्हा एकदा हादरलं, चर्चजवळील व्हॅनमध्ये शक्तीशाली बॉम्बचा स्फोट: श्रीलंकेत बॉम्बस्फोटाचं सत्र अद्यापही थांबताना दिसत नाही. कारण श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील एका चर्चजवळ आज पुन्हा एक मोठा बॉम्बस्फोट झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं होतं. कोलंबोतील एका चर्चमध्ये एका व्हॅनमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. जेव्हा बॉम्बनाशक पथक हा बॉम्ब निकामी करण्याचं काम करत होते त्यावेळेसच या बॉम्बचा स्फोट झाला. संपूर्ण VIDEO पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. Lok sabha 2019: तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या, सुप्रिया सुळेंपासून थेट राणेंपर्यंत अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला: लोकसभा निवडणूक २०१९च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेला प्रचार तोफा अखेर काल (रविवार) थंडावल्या आहेत. त्यामुळे आता उमेदवारांसाठी उद्याच्या दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे सर्वच उमेदवारांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आता उमेदवार देखील शेवटच्या क्षणी अतिशय सावध झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात तब्बल १४ जागांवर मतदान पार पडणार आहे. यापैकी अनेक जागा या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. Lok Sabha 2019 : ‘चौकीदार’च्या कोणत्या वक्तव्यावर राहुल गांधी यांचा माफीनामा: वादग्रस्त राफेल डीलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की, चौकीदारच चोर आहे’, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत केले होते. याप्रकरणी राहुल यांनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. निवडणूक प्रचारा्च्या ओघात हे वाक्य बोलून गेल्याचे राहुल यांनी सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण देताना सांगितले आहे. या प्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी कोर्टात तातडीची याचिका दाखल केली होती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. दिग्विजय सिंहनी विचारले- खात्यात १५ लाख आले का? तरूणाच्या उत्तराने झाले सारे हैराण: काँग्रेस नेते आणि भोपाळचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान हैराण करणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका प्रचारसभेदरम्यान दिग्विजय सिंह पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी सभेमध्ये एक प्रश्न विचारला की १५ लाख रूपये तुमच्या खात्यात जमा झाले का? यावेळी एका तरूणाने उत्तर दिले की... सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ एप्रिल २०१९: संजय राऊतांची मुलाखत ते राहुल गांधीचा माफीनामा Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...