दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ एप्रिल २०१९: मतदानाचे अपडेट ते राज ठाकरेंच्या सभेतील मुद्दे

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 23, 2019 | 21:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

top 5 news_leatest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आज देशभरात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. संपूर्ण देशभरातील ११७ मतदारसंघात एकूण ६३.२४ टक्के मतदानाची नोंद झाली. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईच्या सभेत पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका केली. अनेक मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना घेरले. तिसरी बातमी अशी की बॉलिवूड अभिनेता सनी देओलला भाजपने गुरदासपूर येथून उमेदवारी जाहीर केली आहे.  चौथी बातमी अशी की बारामती मतदारसंघात भाजपचा विजय झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 

  1. #Live Lok Sabha elections 2019: सायंकाळी पाचपर्यंत ५७.०१ टक्के मतदान - आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. देशातील १३ राज्यांमधील ११७ मतदारसंघात हे मतदान पार पडले. देशभरात एकूण मतदानाची आकडेवारी ६३.२४ टक्के इतकी झाली. दुसरीकडे राज्यातील १४ मतदारसंघात मतदान पार पडले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  2. VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेतील महत्वाचे मुद्दे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील सभेत पुन्हा एकदा भाजप सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. जेट एअरवेज, पुलवामा हल्ला, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या बर्थडेला जाणे, भाजपच्या खोट्या जाहिराती, मुकेश अंबानींचा काँग्रेसला पाठिंबा, राफेल वाद, शरद पवार या विषयांवरून त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. वाचा सविस्तर बातमी
  3. सनी देओल 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक:  नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल पंजाबच्या गुरदासपूर येथून निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे किरण खेर यांना चंदीगढ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. आई आणि वडिलांनंतर सनी देओल भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
  4. मतदानानंतर अजित पवार यांनी केलं मोठं वक्तव्य - बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन. तसेच भाजपचा पराभव झाल्यास त्यांनी निवृत्ती घ्यावी, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी केले आहे. वाचा संपूर्ण बातमी 
  5. श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी ISIS ने स्वीकारली: मीडिया रिपोर्ट्स - श्रीलंका येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबादारी मंगळवारी दहशतवादी संघटना आयसिसने स्वीकारली आहे. श्रीलंकेत झालेल्या स्फोटात ३२१ नागरिकांचा मृत्यू झाला यात १० भारतीयांचा समावेश आहे. सविस्तर बातमी वाचा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ एप्रिल २०१९: मतदानाचे अपडेट ते राज ठाकरेंच्या सभेतील मुद्दे Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 
Loading...
Loading...
Loading...