दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ८ जुलै २०१९: राज-सोनिया भेट ते टीम इंडियाची सेमीफायनलची तयारी 

Headlines of the 8 July 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

leatest news1_Times Now
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ८ जुलै २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. तर दुसरी बातमी म्हणजे काँग्रेस नेते निरुपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावरच टीका केली आहे. तर तिसरी बातमी म्हणजे आधार कार्डविषयक सरकारने नवं विधेयक संमत केलं आहे. तर चौथी बातमी म्हणजे चोरी झालेला मोबाइल शोधण्यासाठी सरकार आता एक नवी प्रणाली सुरु करणार आहे. तर पाचवी बातमी म्हणजे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय संघ मैदानात सरावासाठी घाम गाळतोय. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधीची भेट, दिल्लीतील राजकारणाने महाराष्ट्रात नव्या चर्चा सुरु!:  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  2. काँग्रेस नेते भांडणातच मश्गुल; देवरांच्या राजीनाम्यावर निरूपम घसरले: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निरूपम यांच्याकडून मुंबई काँग्रेसची सूत्रं मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद होतेच पण देवरांच्या राजीनाम्यानंतर ते आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  3. आधार कार्डबाबत सरकारने केले अतिशय महत्त्वाचे बदल, संसदेत विधेयक संमत: राज्यसभेत आज (सोमवार) आधार विधेयक २०१९ हे आवाजी मतदानाने पारित करण्यात आलं. हे विधेयक वरच्या सभागृहात पारित झाल्यामुळे आता बँक खातं सुरु करताना आणि मोबाइल सीम घेताना आधार कार्ड देणं हे स्वैच्छिक झालं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  4. भारीच... सीम कार्ड किंवा IMEI नंबर बदलल्यानंतरही सापडणार चोरी झालेला मोबाइल!: सरकार पुढील महिन्यात एक नवं तंत्रज्ञान आणणार आहे.  ज्यामध्ये सीम कार्ड किंवा आयएमआय नंबर बदलला तरीही तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाइल सहजपणे सापडू शकतो. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  5. सेमीफायनल सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज: टीम इंडियाचा सेमी फायनलच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघ सरावादरम्यान चांगलाच घाम गाळत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी