दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ जून २०१९: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ते मान्सूनची खबरबात

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 15, 2019 | 21:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

divasbharatil batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १६ जूनला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात काही मंत्र्यांची मंत्रिमंडळात एंट्री होणार आहे तर काहींना डच्चू दिला जाणार आहे. या विस्तारादरम्यान आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मंत्रिपद निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना कृषी मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच वाढला आहे. पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे.

  1. ठरलं बुवा एकदाचं... मंत्रिमंडळ विस्तार उद्या, 'या' मंत्र्याचा शपथविधी निश्चित? - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १६ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे तर काही मंत्र्यांची या मंत्रिमंडळात एंट्री होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही बातचीत केली. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा राजभवन परिसरातच होणार आहे. वाचा सविस्तर बातमी
  2. 'वर्षा'वरुन फोन आल्यावर राधाकृष्ण विखे मुंबईला रवाना, कृषी खातं निश्चित: सूत्र - सूत्रांच्या माहितीनुसार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं मंत्रिपद निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी आज विखे पाटील मुंबईला आले. वर्षावरून फोन आल्याने विखे पाटील घाईने अहमदनगरवरून मुंबईला आले. या वेळी विखे-पाटील यांना कृषी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण बातमी
  3. रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती: उदयनराजे - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद चांगलाच वाढत चालला आहे. मुंबईत पक्ष कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना रामराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. उदयनराजे यांनी रामराजे यांना पिसाळलेला कुत्रा  म्हणत अतिशय खालच्या भाषेत टीका केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
  4. आनंदाची बातमी... 'या' दिवशी मान्सून महाराष्ट्रात पोहचणार, पाच दिवस मुसळधार बरसणार! - पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची आनंदाची बातमी पुणे वेधशाळेने दिली आहे. वायू चक्रीवादळामुळे मान्सून राज्यात येण्यास विलंब झाला. मात्र आता तीन दिवसांत पाऊस राज्यात दाखल होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. मान्सून १८ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. वाचा सविस्तर बातमी
  5. World Cup 2019: ऑस्ट्रेलियाने तोडला टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड - आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आरोन फिंचने शतक झळकावताच ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर आता वर्ल्डकपमधील सर्वाधिक २८ शतकांचा समावेश आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ जून २०१९: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ते मान्सूनची खबरबात Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल