दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ जून २०१९: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न ते वर्ल्डकप रेकॉर्ड

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 16, 2019 | 22:01 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Bigg Boss Marathi Veena opens up on her sweet tooth
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. राज्य मंत्रिमंडळाचा अखेरचा विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात १३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. तर प्रकाश मेहता यांच्यासह ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. राजभवनात हा विस्ताराचा सोहळा पार पडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगलेल्या सामन्या लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने वर्ल्डकपच्या इतिहासातील २३ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत काढला. एकेकाळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर हा बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा चाहता होता. कपिल शर्माने फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांचा फोटो पहिल्यांदाच शेअऱ केला. यावेळी त्याने भावूक पोस्टही टाकली. 

  1. राज्य मंत्रिमंडळ विस्तार: पाहा कोण आहेत १३ नवे मंत्री - राज्यमंत्रिमंडळाचा तिसरा आणि शेवटचा विस्तार आज राजभवन परिसरात पार पडला. या विस्तारात आज १३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात १० भाजपचे तर २ शिवसेनेचे आणि एक आरपीआयच्या मंत्र्याचा समावेश आहे. राधाकृष्ण विखे-पाटील , जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उईके, तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. तर योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांना राज्य मंत्रीपद देण्यात आले. वाचा सविस्तर बातमी
  2. प्रकाश मेहतांसह 'या' सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळलं! - राज्याच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात सहा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा समावेश आहे. डच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये प्रकाश मेहता, विष्णू सवरा, राजकुमार बडोले, प्रविण पोटे, अमरिश आत्राम, दिलीप कांबळे यांचा समावेश आहे. या सहाही मंत्र्यांनी आपआपले मंत्रिपदाचे राजीनामे हे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे सोपावलेत. संपूर्ण बातमी वाचा
  3. World Cup 2019: रोहित-राहुलच्या जोडीने तोडला २३ वर्षे जुना रेकॉर्ड - भारत आणि पाकिस्तान याच्यातील सामन्यादरम्यान लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने क्रिकेटच्या इतिहासातील २३ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला. या दोघांनी ९८ धावांत शतकी भागीदारी केली.     यासोबतच त्यांनी पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी केल्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. वाचा संपूर्ण बातमी
  4. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला शोएब अख्तर करणार होता किडनॅप?     - इकॉनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार एकेकाळी शोएब अख्तर बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा चाहता होता. त्याने तिला सगळ्यात आधी अंग्रेजी बाबू देसी मॅम या सिनेमात पाहिलं. त्यानंतर तो तिचा मोठा फॅन झाला. एका चॅट शोदरम्यान सोनालीचा फोटो आपण कसा पाकीटात ठेवत असून तसंच सोनालीने त्याचा प्रोजेक्ट रिजेक्ट केला तर किडनॅप करण्याची तयारीही शोएबने दर्शवली होती. वाचा संपूर्ण
  5. Father’s Day: कपिल शर्मा वडिलांच्या मृत्यूसाठी करायचा प्रार्थना, जाणून घ्या का ते? - आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. या निमित्त प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने पहिल्यांदाच आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने भावूक पोस्टही लिहिली. कपिलचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांचा मृत्यू कॅन्सरने झाला. यावेळी कॅन्सरमुळे कपिलच्या वडिलांना खूप त्रास होत असे. यावेळी कपिलने त्यांचा हा त्रास कमी होण्यासाठी त्यांच्या मृत्यूचीही प्रार्थनाही केली होती. वाचा सविस्तर 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी