दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ जून २०१९: शिवसेनेचा वर्धापनदिन ते धवन वर्ल्डकपमधून बाहेर

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 19, 2019 | 21:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

divasbharatil batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन आज उत्साहात पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री तसेच भाजपसाठी जाताजाता सूचक विधानही केले. विधानभवनाच्या जेवणाच्या कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याची घटना घडली. या प्रकरणी सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात २० रूपयांची तर चांदीच्या दरात १३० रूपयांची वाढ झाली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाला हत्येच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यानंतर पटेल यांनी पहिल्यांदाच मीडियाला प्रतिक्रिया दिली. वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे शिखर धवन या स्पर्धेत आता खेळू शकणार नाही. 

  1. VIDEO: 'सर्वकाही समसमान असायला हवं'- उद्धव ठाकरे - शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसैनिकांना उद्देशून भाषण केले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाषण केले. आपल्या भाषणात उद्धव यांनी सर्वकाही समसमान असायला हवे असे म्हणत अप्रत्यक्षपणे सूचक वक्तव्यही केले. तसेच ही युतीची दुसरी गोष्ट असल्याचेही ठाकरे म्हणाले. सविस्तर बातमी वाचा
  2. मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे, विधानभवनाच्या कॅन्टिंनमधील प्रकार - विधानभवनातील जेवणाच्या कॅन्टिनमध्ये धक्कादायक बाब आढळून आली आहे. येथील कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळीमध्ये चक्क चिकनचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखेंनी मटकीची उसळ मागवली होती मात्र त्यांना यात चिकनडे तुकडे आढळले. यानंतर विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
  3. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक - केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली आहे. यानंतर प्रल्हाद पटेल यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हे खूपच दुर्देवी आणि दु:खद असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी पुढे बोलण्यासही नकार दिला. प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबळ पटेल यांच्यावर दंगल माजवणे आणि हत्येचा प्रयत्न करणे हे आरोप लावण्यात आले आहे. प्रल्हाद पटेल हे सांस्कृतिक राज्य मंत्री(स्वतंत्र कार्यभार) आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
  4. Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, पाहा किती रुपयांनी महागलं सोनं - सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी तुम्ही घराबाहेर निघत असाल तर हे जरूर वाचून जा. सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोने बाजारात सोन्याच्या दरात २० रूपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर हे प्रतितोळा ३३,७४० रूपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळाली. चांदीचे दर १३० रूपयांनी वाढून ते ३८,३५० प्रति किलोग्रॅम इतके पोहोचले. वाचा संपूर्ण बातमी
  5. वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा झटका, शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर - वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे शिखर या स्पर्धेतील एकही सामना खेळू शकणार नाही. दरम्यान, त्याच्या जागी संघात रिषभ पंतला स्थान देण्यात आले आहे. शिखरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. मात्र ही दुखापत बरी होण्यास अधिक काळ लागू शकतो यामुळे त्याने माघार घेतली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी