दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जून २०१९: हिमाचलमध्ये बसला अपघात ते सोन्याचा उच्चांक

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 20, 2019 | 21:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

divasbharatil batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला असून यात २५ जण दगावल्याची भीती आहे. राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीने शिकवणे गरजेचे असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मान्सून राज्याच्या वेशीवर येऊन ठेपला असून त्याने तळकोकणात दमदार हजेरी लावली. लवकरच तो संपूर्ण राज्यात व्यापून जाईल अशी माहिती हवामान विभागाने दिली. सोन्याच्या दराने आज पाच वर्षातील उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात गेल्या पाच वर्षात जितकी वाढ झाली नाही तितकी आज पाहायला मिळाली. अहमदनगरच्या पाथर्डी जिल्ह्यात नुकतीच लग्न झालेली नववधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली. देवदर्शनाला आलेली नववधू प्रियकरासोबत बाईकवरून पळून गेली. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

  1. हिमाचल :  ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती - हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एका बसला मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथील बंजारहून एक किमी अंतरावरील भियोठ येथील वळणावर एक प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तब्बल २५ जणांनी आपला जीव गमावला असल्याची भीती व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या बसमधून ६० जण प्रवास करत होते. वाचा सविस्तर बातमी
  2. राज्यातील सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक – देवेंद्र फडणवीस - राज्याच्या सर्व बोर्डांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसपरिषदेत दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. सीबीएससी आणि आयसीएसई शाळांमध्ये मराठी भाषा शिकवत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  3. सर्वात आनंदाची बातमी... मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, तळ कोकणात पावसाला सुरुवात - पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेला मान्सून राज्याच्या वेशीवर येऊन पोहोचला आहे. राज्यामध्ये तळकोकणात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. काही दिवसांतच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच २५ तारखेपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसण्यास सुरूवात होईल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे बळीराजा नक्कीच सुखावणार आहे. सविस्तर बातमी वाचा
  4. Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला ५ वर्षांचा उच्चांक - सोन्याच्या दराने आज गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक उच्चांक गाठला. आंतरराष्ट्र्रीय बाजारात सोन्याचे दर १३८० डॉलर प्रति औंसवर जाऊन पोहोचले. याआधी २०१४मध्ये हे दर १३८३.८ डॉलर प्रति औंसावर पोहोचले होते. त्यानंतर पाच वर्षांनी सोन्याने इतका मोठा दर गाठला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २८० रूपयांनी वाढून ते प्रतितोळा ३४ हजार रूपयांवर पोहोचले तर चांदीच्या दरात ७१० रूपयांची वाढ होत ते ३९६० प्रति किलोवर स्थिरावले. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना मात्र याचा फटका बसत आहे. वाचा संपूर्ण बातमी
  5. VIDEO: नववधू प्रियकरासोबत बाइकवरुन पळाली, सर्व घटना देवस्थानच्या CCTV मध्ये कैद  - लग्नानंतर नवरी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे तुम्ही सिनेमांमध्ये पाहिले असेल. मात्र अहमदनगरच्या पाथर्डी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात नवीन लग्न झालेले जोडपे मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. यावेळी नवरामुलगा आपली बाईक आणण्यासाठी पार्किंगमध्ये गेला. याचाच फायदा घेत नववधू प्रियकरासोबत त्याच्या बाईकवरून पळून गेली. याची तालुक्यात मात्र चांगलीच चर्चा रंगत आहे.हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जून २०१९: हिमाचलमध्ये बसला अपघात ते सोन्याचा उच्चांक Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल