दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ जून २०१९: भाजप आमदाराला अटक ते सोन्याच्या दरात घट

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 26, 2019 | 23:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 26 june 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

leatest news1
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ जून २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे भाजप आमदार आणि कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे टीम इंडियाच्या भगव्या जर्सीमुळे आता एक नवा वाद सुरु झाला आहे. तर तिसरी बातमी म्हणजे मॉब लिंचिंगच्या घटनेवरुन पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला. तर चौथी बातमी ही मुंबईकरांसाठी आहे. कारण मान्सूनने मुंबई गाठली आहे. पाचवी बातमी ही सामान्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे. ती बातमी म्हणजे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.  जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. VIDEO: भाजप आमदार आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाची अधिकाऱ्याला बॅटने मारहाण: इंदूरमधील भाजपचे आमदार आणि भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय यांना कोर्टाने जामीन नाकारला आहे. ही बातमी आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी 
  2. टीम इंडियाच्या 'भगव्या जर्सी'बाबत काँग्रेसने घेतला आक्षेप: ३० जूनला इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया जी जर्सी वापरणार आहे त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  3. मॉब लिंचिंगवरून पंतप्रधान विरोधकांवर भडकले; झारखंडची बदनामी करू नका!: देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांमुळं चिंता व्यक्त होत असताना, संसदेच्या अधिवेशनातही मॉब लिंचिंगचा विषय चर्चेला आहे. विरोधीपक्षांनी सरकार जोरदार टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  4. आला रे आला! अखेर मुंबईसह राज्यात मान्सूनचं आगमन: अखेर मुंबईसह राज्यात मान्सूनचं आगमन झालं असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय. मान्सून मुंबईत दाखल झाला असून त्यानं संपूर्ण राज्य व्यापलं असल्याचं हवामान खात्यानं मंगळवारी स्पष्ट केलं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  5. सोन्याच्या दरात घसरण: भारतात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.  सोन्याला स्थानिक बाजारातून मागणी कमी असल्यानं दर घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ जून २०१९: भाजप आमदाराला अटक ते सोन्याच्या दरात घट Description: Headlines of the 26 june 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles