दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ मे २०१९: बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का ते चीनचा भारताबद्दल बदललेला दृष्टिकोन

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2019 | 20:46 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

divasbharatil batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात.  बीडमधील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे. व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी ईव्हीएमआधी केली जावी ही विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. निवडणुकीची मतमोजणी नेहमीच्या पद्धतीनेच होईल असे आयोगाने स्पष्ट केले. दिल्लीच्या टिकटॉकवरील एका सेलिब्रेटीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या सेलिब्रेटीचे टिकटॉकवर तब्बल ५ लाख फॉलोअर्स आहेत. सेलिब्रेटी तसेच प्रभावी व्यक्तींचा पर्सनल डेटा इन्स्टाग्रामवरून लीक होत असल्याची माहिती समोर आली आहे. हाय-प्रोफाइल प्रभावशाली व्यक्तींचे ४ कोटी ९० लाख रेकॉर्डचा समावेश आहे. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर भारताबद्दल चीनची आडमुठी भूमिका बदलताना दिसत आहे. हे चांगले चित्र आहे. 

  1. राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागरांनी बांधले ‘शिवबंधन - राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे. पक्षात घुसमट होत होती. स्वाभिमानाला ठेच पोहोचल्याने हा निर्णय घेतल्याचे क्षीरसागर यांनी प्रवेशादरम्यान सांगितले. उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर कुटुंबाचे शिवसेनेत स्वागत केले. सविस्तर बातमी वाचा
  2. Lok Sabha 2019: मतमोजणी ठरल्याप्रमाणेच; विरोधकांच्या मागण्या आयोगाने फेटाळल्या - लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ही ठरवल्याप्रमाणेच होईल असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिली आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाची पहिल्यांदा मोजणी करावी अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी आयोगाने धुडकावून लावली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  3. Tik Tok वर ५ लाख फॉलोवर्स असलेल्या सेलिब्रिटीची गोळी झाडून हत्या - टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या सेलिब्रेटीची दिल्लीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बहादूरगढ येथे राहणारा मोहित हा जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. यावेळी त्याच्यावर मंगळवारी रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  4. Instagram: इंस्टाग्रामवरून सेलिब्रिटींचे मोबाइल नंबर झाले लीक! - फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गच्या मालकीची फोटो शेअरिंग कंपनी इन्स्टाग्रामवरून महत्त्वपूर्ण डेटा लीक झाल्याची माहिती मिळत आहे. इन्स्टाग्रामवरून सेलिब्रेटी आणि प्रभावी व्यक्तींचा पर्सनल डेटा लीक होत असल्याची बाब उघड झाली आहे. या डेटामध्ये माहिती, प्रोफाइल फोटो, फॉलोवर्सची संख्या, लोकेशन, आणि प्रायव्हेट कॉन्टॅक्ट नंबर यांचा समावेश आहे. वाचा सविस्तर बातमी
  5. India-China: चीनचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलला; चीनच्या मावळत्या राजदूतांनी केला खुलासा - चीनचा भारताबद्दलचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. भारताविषयी चीनने जी आडमुठी भूमिका घेतली होती ती बदलताना दिसत आहे. चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनी हा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध चांगले राहतील असेही लुओ म्हणाले. वाचा संपूर्ण बातमी...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ मे २०१९: बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का ते चीनचा भारताबद्दल बदललेला दृष्टिकोन Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...