दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ मे २०१९: मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड ते सनातनच्या वकिलाला अटक

लोकल ते ग्लोबल
Updated May 26, 2019 | 01:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

latest_tn
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ मे २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज राजधानी दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची एकमताने निवड झाली. यावेळी मोदींनी एनडीएमधील आपल्या घटक पक्षांचेही आभार मानले. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या वकीलालाच सीबीआयने अटक केली आहे. तर तिकडे कर्नाटकमध्ये एका अभिनेत्री अपक्ष निवडणूक लढवत मुख्यमंत्र्याच्या मुलालाच पराभूत केलं. तर भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे बीफच्या अफवेवरून मुस्लिम जोडप्याला जमावाने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे माउंट एव्हरेस्टवरून उतरताना राज्यातील २ गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 
 या सगळ्या बातम्या सविस्तर जाणून घ्या... 
 

  1. २०१९ची निवडणूक ही समतेचं प्रतिक: मोदी: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज (शनिवार) एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत एनडीएचे नवनिर्वाचित खासदार आणि अन्य पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीत औपचारिकरित्या नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावाही केला. दरम्यान, याआधी मोदींनी एनडीएच्या बैठकीत नवनिर्वाचित खासदारांना संबोधितही केलं. बैठकीच्या सुरुवातीला मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वाद देखील घेतले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
  2. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या वकिलालाच सीबीआयने केली अटक: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवगंत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली आहे. २०१३ साली दाभोलकर यांची हत्या झाली होती. याच खटल्याप्रकरणी आता सीबीआयने सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच विक्रम भावे याला देखील मुंबईतून अटक करण्यात आली. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी शरद कळसकर याच्या जबाबानंतर सीबीआयने आज (शनिवार) ही अटक केली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
  3. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीनं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा केला पराभव: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं ३०३ जागांवर विजय मिळवत एक इतिहास रचलाय. एनडीएला एकूण ३५२ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या या इतिहासात एका राज्यातील अभिनेत्रीनं एक ऐतिहासिक विजय मिळवलाय. ती अभिनेत्री आहे सुमनलता अंबरीश आणि ते राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकात भाजपनं २३ जागांवर विजय मिळवला. पण तिथं कन्नड अभिनेत्री सुमनलता अंबरीशनं मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा तब्बल १ लाख मतांनी पराभव केलाय. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
  4. बीफच्या अफवेवरून मुस्लिम जोडप्याला जमावाची मारहाण, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल: मध्य प्रदेशातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं एका मुस्लिम जोडप्याला बीफ नेत असल्याच्या आरोपावरुन काही लोकांनी मारहाण केली. तसंच पीडितांना जबरदस्तीनं धार्मिक घोषणा सुद्धा देण्यास भाग पाडलं गेलं. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक केलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
  5. माउंट एव्हरेस्टवरून उतरताना राज्यातील २ गिर्यारोहकांचा मृत्यू, आतापर्यंत ८ भारतीयांचा गेला जीव: ज्यातील गिर्यारोहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केल्यानंतर उतरताना राज्यातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशातील ८ गिर्यारोहकांचा या आरोहणात मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. ठाण्यातील अंजली कुलकर्णी (५३ वर्षे) आणि अकलूज इथले निहाल बागवान (२७) मृत्युमुखी पडले आहेत. मृत्यू झालेल्या गिर्यारोहकांमध्ये एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाचाही समावेश आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ मे २०१९: मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड ते सनातनच्या वकिलाला अटक Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles