दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० सप्टेंबर २०१९: काँग्रेस पक्षाला खिंडार ते पाकिस्तानची कबुली

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 10, 2019 | 20:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 10 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० सप्टेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला पडलेल्या खिंडारासंदर्भातील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दुसरी बातमी आहे ती माजी मंत्री आणि माजी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दिवसभरात काँग्रेस पक्षाला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे. तिसरी बातमी आहे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत आघाडी करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याची. चौथी बातमी आहे वैद्यकीय प्रवेशात १० टक्के आरक्षणाच्या संदर्भातील. पाचवी आणि शेवटची बातमी आहे जम्मू-काश्मीर संदर्भात पाकिस्तानने सत्य स्वीकारल्याच्या संदर्भातील. 

  1. उर्मिला मातोंडकरचा तडकाफडकी राजीनामा: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात सुरू असलेल्या वाद, कुरुबुरींना कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमधून गळती: माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. उद्या होणाऱ्या भाजपच्या मेगाभरतीमध्ये कृपाशंकर सिंह हे भाजपत प्रवेश करणार आहेत. कृपाशंकर सिंह यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. काँग्रेसला दिला हा प्रस्ताव, त्यामुळे आघाडी नाही: आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची आघाडी होणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व जागा स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं वृत्त आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. ग्रामीण भागात सेवा द्या आणि वैद्यकीय प्रवेशात आरक्षण मिळवा: राज्यातील दुर्ग भागातील आरोग्य व्यवस्था आणखीन बळकट व्हावी यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष आरक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शासकीय, महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळी काही ठराविक जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. अखेर पाकिस्तानने मान्य केलं सत्य: जम्मू-काश्मीर हा भारताचाच एक भाग असल्याचं पाकिस्तानने अखेर मान्य करत कबुली दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत ही कबुली दिली आहे. सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० सप्टेंबर २०१९: काँग्रेस पक्षाला खिंडार ते पाकिस्तानची कबुली Description: Headlines of the 10 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी