दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ सप्टेंबर २०१९: निवडणुकीपूर्वी आनंदाची बातमी ते राष्ट्रवादीला खिंडार

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 11, 2019 | 21:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 11 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ सप्टेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... केंद्र सरकारने लागू केलेल्या मोटार वाहन कायद्याला राज्य सरकारने तुर्तास स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने घेतेलल्या या निर्णयामुळे वाहनचालकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. दुसरी बातमी आहे भारतीय सैन्याने केलेल्या मोठ्या कारवाईची. भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबाचा आसिफ हा दहशतवादी गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय होता. तिसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव संदर्भातील. चौथी बातमी आहे देसी गर्ल प्रियंका चोपडाच्या आगामी सिनेमातील डायलॉगमुळे महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या ट्विट संदर्भातील. तर पाचवी बातमी आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या मोठ्या झटक्या संदर्भातील. 

  1. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने लागू केलेल्या मोटार वाहन कायद्याला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेतला नसल्याचं दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. भारतीय सैन्याची मोठी कारवाई: भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आसिफ याचा खात्मा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याने काश्मीरमध्ये आपली दहशत पसरवली होती आणि मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचं समोर आलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या २७७२ भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा लिलाव केला जाणार आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. प्रियंका चोपडाला महाराष्ट्र पोलिसांचं उत्तर: अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या चर्चेत आहे ती वेगळ्याच कारणामुळे. कारण तिच्या आगामी सिनेमाचा एक ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी एक खास ट्विट करत प्रियंकाला उत्तर दिलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार: विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी