दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ सप्टेंबर २०१९: उदयनराजेंचं ठरलं ते लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 12, 2019 | 21:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 12 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ सप्टेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची. खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. तसेच भाजप प्रवेशाची तारीखही समोर आली आहे. दुसरी बातमी आहे पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची. गुरुवारी सकाळच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही कर्नाटकमधील आहे. तिसरी बातमी आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एका टॅक्सी चालकाने केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या संदर्भातील. सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकात या विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला. चौथी बातमी आहे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाच्या निवडीची. या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे. यावेळी केएल राहुलच्या जागेवर शुभमन गिल याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकव्याप्त काश्मीर संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातील. 

  1. अखेर राजेंचं ठरलं! मोदी बागेतून थेट मोदींसोबत: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता अखेर उत्तर मिळालं आहे. उदयनराजे भोसले येत्या १४ सप्टेंबर रोजी भाजतप प्रवेश करणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. बस अपघातात सहा जणांचा मृत्यू: गुरुवारी पुणे-बंगळुरू महामार्गावर एका खासगी बसला भीषण अपघात झाला. खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून कोल्हापूकच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. सुप्रिया सुळेंसोबत टॅक्सी चालकाचं आक्षेपार्ह वर्तन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या रेल्वेने मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात आल्या. यावेळी एका टॅक्सी चालकाने त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रारही केली आहे.
  4. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर: बीसीसीआयने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ ऑक्टोबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य: भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गुरुवारी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाकव्याप्त काश्मीर संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे असं वक्तव्य बिपीन रावत यांनी केलं आहे. लष्करप्रमुखांनी केलेलं हे वकत्य म्हणजे पाकिस्तानसाठी एक इशाराच आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...