मुंबई: Top 5 News of the Day 13 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी मुंबईच्या मुच्छड पानवाल्याला अटक केल्यानंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांचा जावई समीर खानला त्यांनी चौकशीसाठी बोलावले आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी झाली असून सीरम इन्स्टिट्यूटकडूनही लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरण नेमकं कसं होणार आहे याबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डिजिटल पद्धतीने बैठकीला संबोधित करताना म्हटले, ‘सर्वात आधी दहशतवादाचा सामना करण्यासाठी दृढ राजकीय इच्छाशक्ती दिसायला हवी.’
चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे हिंदू महासभेने सुरू केलेली 'गोडसे ज्ञानशाळा' अवघ्या दोनच दिवसांत बंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील आपल्या कार्यालयात हिंदू महासभेने हे वाचनालय सुरू केलं होतं. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे बाबरी प्रकरणात आडवाणी, उमा भारती, कल्याणसिंह यांच्यासह ३२ जणांना मुक्त करण्याच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अलाहाबादच्या उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.