दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ ऑगस्ट २०२०: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन ते ४ लाख कोरोनामुक्त

Headlines of the 14 August 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 14 August 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण, कोकण रेल्वेने कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन्सची घोषणा केली आहे. दुसरी बातमी आहे चीनच्या आक्रमकतेवर अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. तिसरी बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चौथी बातमी आहे शरद पवारांनी पार्थबाबत केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के इतके झाले आहे.

  1. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन्स : मध्य रेल्वेने (Central Railway) कोकण विभागासाठी गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेन्स (Ganpati Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून एकूण १६२ ट्रेन्स गणेशोत्सवाच्या काळात चालवल्या जाणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. चिनी ड्रॅगनची घेराबंदी : अमेरिकेने भारताला दिली साथ : अमेरिकेतील दोन शक्तीशाली सीनेटरर्सच्या समुहांनी गुरूवारी सीनेटमध्ये एक प्रस्ताव ठेवून भारताबाबत चीनच्या आक्रमकतेवर टीका केली आहे. अमेरिकन सीनेटमध्ये गुरूवारी एक द्वीपक्षीय प्रस्तावर सादर करण्यात आला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह  (Tests Negative for COVID19) आली आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. अमित शहा यांना २ ऑगस्ट २०२० रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. शरद पवारांनी पार्थबाबत केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले... : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बाबत केलेलल्या वक्तव्यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात (Maharashtra) कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले (Covid19 Patients discharged) आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी