मुंबई: Top 5 News of the Day 15 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाची आहे कारण राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरी बातमी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसरी बातमी धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी महिला एसपी करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले आहेत. चौथी बातमी राज्यातील विविध भागांत पक्षी मृतावस्थेत आढळण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यानंतर आता राज्य सरकारने एक टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. पाचवी आणि शेवटची बातमी म्हणजे शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या आज झालेल्या फेरीतही कोणताही तोडगा निघालेला नाहीये.