दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०२०: अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० लाखांच्या आसपास ते जया बच्चन भडकल्या

Headlines of the 15 September 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 15 September 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी संसदेच्या दोनही सभागृहांच्या कामकाजाचा आज दुसरा दिवस आहे. जया बच्चन यांनी म्हटले की बॉलिवूडची उगाचच बदनामी केली जात आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(MHADA to build affordable houses in Mumbai and Thane)यांनी म्हटले आहे. तिसरी महत्त्वाची बातमी भाजप खासदार उन्मेष पाटील हे आमदार असताना. एका माजी सैनिकाला मारहाण केल्यानंतरही तत्कालिन सरकारने आरोपींवर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्याप्रकरणी आता चौकशी होणार आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे देशात मागील २४ तासात तब्बल १०५४ रुग्णांचा मृत्यू झाला. मागच्या एका दिवसात ८३,८०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ४९,३०,२३७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  १० वाजून १५ मिनिटांनी  पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.३८ टक्के म्हणजे १९७ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार ८८४ रुपयांवर ट्रेंड करत होता. जाणून ह्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. 'ज्या ताटात जेवता त्यालाच भोक पाडता', जया बच्चन भडकल्या: समाजवादी पक्षाच्या(samajwadi party) खासदार जया बच्चन(jaya bachchan) यांनी सिनेजगताला(bollywood) बदनाम करण्याचा मुद्दा उचलला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. म्हाडा मुंबईकरांना देणार मोठी भेट, मुंबई आणि ठाण्यात देणार स्वस्त घरे: मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न (Dream to have a home in Mumbai) असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार (government to take efforts to fulfill this dream) असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. माजी सैनिकाला मारहाण प्रकरणी संबंधित भाजप खासदारांची नव्याने चौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख: जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण केल्याचे प्रकरणाची चौकशी नव्याने होणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० लाखांच्या उंबरठ्यावर, चिंताजनक परिस्थिती: भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यातही आता चिंताजनक बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patients) संख्या ही दहा लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. सोने चांदी आजचा भाव, १५ सप्टेंबर २०२०: सोने-चांदीत तेजी, फटाफट चेक करा १५ सप्टेंबरचा भाव: वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी