दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ जानेवारी २०२१: चॅटमध्ये PMOचा उल्लेख ते सेना-काँग्रेसमध्ये रंगला सामना

Headlines of the 17 January 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 17 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी अर्णब गोस्वामी आणि BARCचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. या चॅटमुळे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे औरंगाबादच्या नामांतरावरुन सुरू असलेला वाद आता आणखी चिघळत चालल्याचं दिसत आहे. शिवसेनेने काँग्रेस पक्षावर टीका केल्यावर आता काँग्रेसनेही शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. तिसरी महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मुंडे यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.

चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव  दिसतो, असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३३६ धावा केल्या, याआधी ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ३६९ धावा केल्या. नंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा केल्याने त्यांच्याकडे ५४ धावांची आघाडी आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. 'PMOसोबत वेगळ्या पद्धतीने व्यवहार केला जात आहे', अर्णबच्या WhatsApp चॅटमध्ये पीएमओचा उल्लेख का?: रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा (PMO)चा सुद्धा उल्लेख आहे ज्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये रंगला सामना, बाळासाहेब थोरातांचं शिवसेनेला प्रत्युत्तर: नामांतराला काँग्रेसचा पाठिंबा नसल्याने हा वाद वाढला आहे. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक मत मांडत शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. या टीकेला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. ‘मंत्रीजी मला व्हिडिओ सेक्स करायला सांगत असत’, गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप: महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात (politics) गेल्या काही दिवसांपासून कॅबिनेट मंत्री (cabinet minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) फारच चर्चेत आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर: महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव  दिसतो, असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भारत ३३६; ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात बिनबाद २१ आणि ५४ धावांची आघाडी: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा केल्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे असलेली आघाडी ५४ धावांची झाली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी