दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ मार्च २०२१: मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी ते राज्यात कोरोनाचा उद्रेक

Headlines of the 17 March 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 17 March 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली आहेत. दुसरी बातमी राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात तब्बल २३,१७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे महाराष्ट्राची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकडे होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तिसरी बातमी अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरन मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे अटक प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केले आहेत. चौथी बातमी कोरोना प्रतिबंधक लस यावरुन महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात राजकारण रंगले आहे. पाचवी आणि शेवटची बातमी भाजप खासदार राम स्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

  1. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. तर परमबीर सिंग यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात आज कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रात आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ % एवढे झाले आहे. आज राज्यात २३,१७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. वाझेंचा 'राजकीय साहेब' शोधणे आवश्यक : सचिन वाझे आणि नुकतीच पोलीस आयुक्त पदावरुन बदली झालेले परमबीर सिंह ही छोटी माणसं आहेत. त्यांना हाताळणारे 'राजकीय साहेब' शोधणे आवश्यक आहे. वाझेंना ऑपरेट करणारा पॉलिटिकल बॉस शोधणे आवश्यक आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य महाराष्ट्राचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. जावडेकरांनी ठाकरे सरकारला टोचली लस! : कोरोना प्रतिबंधक लस यावरुन महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात राजकारण रंगले आहे. केंद्राकडून दर आठवड्याला २० लाख डोस मिळावे, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक ट्वीट करुन आकडेवारी जाहीर करत महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. भाजप खासदार राम स्वरुप शर्मा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह : भाजप खासदार राम स्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्ली येथील आरएमएल हॉस्पिटल परिसरात गोमती अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये राम स्वरुप शर्मा यांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानात राम स्वरुप शर्मा यांचा मृतदेह  फाशी गेलेल्या अवस्थेत आढळला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी