दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑक्टोबर २०२०: दसऱ्यापासून जिम सुरू ते टाइम्स नाऊ मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट

Headlines of the 17 October 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 17 October 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे राज्यात दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. दुसरी बातमी म्हणजे पुढील चार ते पाच दिवस पुन्हा काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तिसरी बातमी म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोलापुरचा दौरा करणार आहेत. चौथी बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे टाइम्स नाऊ मराठीच्या वृत्तानंतर राज्यमंत्र्यांनी आपला दौरा बदलला आणि शेतकऱ्यांची भेट घेतली.

  1. दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु होणार : कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्या पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी आणि एसओपीचे पालव करावे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. पुढील चार दिवस पावसाचे : राज्यातील विविध भागांत गेल्या आठवड्याभरात जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर आता पुढील चार ते पाच दिवस पुन्हा काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार (१९ ऑक्टोबर) रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. कंगना अडचणीत, एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश : वांद्रे येथील न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात एफआयआर  दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्यावर द्वेषपूर्ण वक्तव्ये करून दोन समूहांमध्ये शत्रुता पसरवण्याचा आणि चित्रपटसृष्टीचे धर्माच्या आधारावर विभाजन  केल्याचा आरोप आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. टाइम्स नाऊ मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, राज्यमंत्री बनसोडेंनी दौरा बदलला : संजय बनसोडे यांच्या नियोजित दौऱ्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नियोजित वेळ ही सर्वात शेवटी होती. मात्र टाइम्स नाऊ मराठीने सदर बातमी दाखवताच बनसोडे यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी