दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ जानेवारी २०२१: सेना-भाजपमध्ये जोरदार टक्कर ते मोदींचे पोस्टर्स पाकमध्ये झळकले

Headlines of the 18 January 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 18 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी महाराष्ट्रात आज जवळजवळ १२ हजाराहून अधिक ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांचं लक्ष याकडे लागून राहिलं आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान परस्पर विरोधी बातम्या समोर आल्याने आश्चर्यचकित व्यक्त होत आहे. तिसरी महत्त्वाची बातमी राणेंना धक्का देणारा अजून तरी जन्माला आलेला नाही. असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. कारण की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. 

चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे पाकिस्तान सध्या अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत आहे. याचदरम्यान आता बलुचिस्तानप्रमाणेच सिंध शहरातूनही स्वातंत्र्याची मागणी होताना दिसत आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर एका दिवसाने एका वॉर्डबॉयचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या या संशयास्पद मृत्यूने खळबळ माजली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार टक्कर: महाराष्ट्रात आज जवळजवळ १२ हजाराहून अधिक ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांचं लक्ष याकडे लागून राहिलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. आदर्श सरपंच पेरे-पाटील हरले, तर आदर्श गाव हिवरेबाजार जिंकले!: निवडणुकीच्या निकालांमध्ये आदर्श सरपंच म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेले भास्कर पेरे-पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही: नितेश राणे: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, 'राणेंना धक्का देणारा जन्माला आलेला नाही.' सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. पाकिस्तानमध्ये झळकली PM मोदींचे पोस्टर्स, स्वतंत्र सिंधुदेश’साठी मागितली मदत (Video): पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर आणि सिंध प्रांतातून स्वातंत्र्याची मागणी जोर धरत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात पंतप्रधान मोदींसह इतर जागतिक नेत्यांचे पोस्टर घेऊन विरोधप्रदर्शन केले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. कोरोनाची लस घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू, श्वास घेण्यास झाला त्रास:  मुरादाबाद (Moradabad) जिल्ह्यात कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यानंतर एका दिवसाने एका वॉर्डबॉयचा मृत्यू (ward boy dead) झाल्याची माहिती समोर येत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी