मुंबई: Top 5 News of the Day 19 February 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. आज राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. दुसरी बातमी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता अनेक जिल्ह्यांत, शहरांत कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तिसरी बातमी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक होत पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. चौथी बातमी मोदी सरकारने लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि शेवटची बातमी सोने आणि चांदीच्या भावात घसरण सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.