दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ जानेवारी २०२१: भारताचा ऐतिहासिक विजय ते सूरतमध्ये अपघातात १३ जणांचा मृत्यू

Headlines of the 19 January 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 19 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी भारतीय संघाने ब्रिस्ब्रेन कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. या विजयासह भारताने पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये ब्रिस्बेनमधील भारताचा पहिला विजय आणि ऑस्ट्रेलियामधील दुसर्‍या कसोटी मालिकेतील विजय आहे. याच कामगिरीमुळे बीसीसीआयने भारतीय संघासाठी बोनस जाहीर केला आहे. तिसरी महत्त्वाची बातमी गुजरातमधील सूरत येथे एका अनियंत्रित डंपरने रस्त्यावर झोपलेल्या १८ मजुरांना चिरडले. ज्यामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या देखील अटकेची मागणी करण्यात आली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे आठवड्यातील चार दिवस राज्यातील 285 केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. हा नव्या भारताचा विजय आहे, पाहा कांगारुंना कसं लोळवलं!: भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. कारण ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया टीम इंडियाने करुन दाखवली आहे. शेवटच्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. BCCIने टीम इंडियाला जाहीर केला 'एवढ्या' कोटींचा बोनस: टीम इंडियाने मंगळवारी ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की संघाला पाच कोटींचा बोनस देण्यात येईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. सूरतमध्ये भीषण अपघात, डंपरने १८ जणांना चिरडले, १३ जणांचा मृत्यू: गुजरातमधील सूरत येथे एका भयंकर  अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा!: सचिन सावंत: अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामीकडे कशी आली?, हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण: राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी