दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० फेब्रुवारी २०२१: राज्यात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ते पेट्रोल-डिझेल दरवाढ

Headlines of the 20 February 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 20 February 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी आज राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. दुसरी बातमी महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पण आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेत ५.२ टक्के डोस वाया गेले. तिसरी बातमी अहमदनगरमधील प्रसिद्ध डॉक्टरांनी आपल्या दोन मुलांसह पत्नीला विषारी इंजेक्शन देत आत्महत्या केली आहे. चौथी बातमी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गायब असलेले मंत्री संजय राठोड हे प्रथमच माध्यमांसमोर येणार असल्याचं वृत्त आहे. पाचवी आणि शेवटची बातमी सलग १२व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

  1. आज राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांचे निदान : महाराष्ट्रात आज २,५६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१६% एवढे झाले आहे. आज राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसचे ५.२ टक्के डोस गेले वाया : महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पण आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेत ५.२ टक्के डोस वाया गेले. जवळपास ४० हजार डोस वाया गेले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. दोन मुलं आणि पत्नीला विषारी इंजेक्शन देत डॉक्टरची आत्महत्या : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ महेंद्र थोरात त्याची पत्नी दोन मुले हे आज आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली. १६ वर्षीय मुलाला कानाने ऐकता येत नाही तर त्याला समाजात मिळणाऱ्या अपमानास्पद आणि अपराधीपणाच्या वागणुकीमुळे डॉक्टर महेंद्र थोरात यांनी स्वःत सह आपल्या कुटुंबीयांना देखील संपवले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. मंत्री संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब 'या' ठिकाणी येणार : राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गायब झाले होते. मात्र, आता संजय राठोड हे अनेक दिवसांनी सर्वांसमक्ष येणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या मंगळवारी ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे येऊन देवीचं दर्शन घेणार असून यावेळी संजय राठोड हे मीडियाशी बोलणार असून, ते काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. सलग 12व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. आज सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 39 पैशांनी तर डिझेलच्या दरात 37 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी