दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जानेवारी २०२१: ट्रॅक्टर रॅलीबाबत कोर्ट म्हणालं... ते अपघातात १३ जणांचा मृत्यू

Headlines of the 20 January 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 20 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च काढणार आहेत, यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती, पण आता कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एका भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. तिसरी महत्त्वाची बातमी राज्यात भाजप आणि आरपीआयला ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच  जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रामदास आठवले यांनी आज केला.

चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे सध्या देशभरात १ लाख ९७ हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. गेल्या काही दिवसात अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की हे फळ कमळांच्या फुलासारखे आहे म्हणून त्यास ड्रॅगन फळाऐवजी कमलम म्हणणे अधिक योग्य ठरेल. यामागे राजकीय काहीही नाही. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. 'आम्ही आदेश देणार नाही', २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत सुप्रीम कोर्टाने पाहा काय-काय म्हटलं:  केंद्र सरकारने २६ जानेवारी रोजी तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीवर हस्तक्षेपाची विनंती करणारी सुप्रीम कोर्टाची याचिका मागे घेतली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. दाट धुक्याने केला घात, भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू: पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal)  दाट धुक्यामुळे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात (Road accident) झाला आहे. ज्यामध्ये तब्बल १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. भाजपच्या साथीचा झाला फायदा, आठवलेच्या पक्षाला ग्रामपंचायतीत 'इतक्या' जागा: राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून  2 हजार 960 पेक्षा अधिक सदस्य रिपाइंचे  निवडून आले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. चांगली बातमी... अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाखांहून देखील कमी: गेल्या २४ तासात देशभरात १६,९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. 'ड्रॅगन फ्रूट' गुजरातमध्ये बनले 'कमलम' , मुख्यमंत्री रुपाणी यांनी केले जाहीर... सरकारने बदलले नाव: शहरे, चौकांचे नामांतर केल्यामुळे बर्‍याचदा चर्चेत असलेल्या गुजरात सरकारने आतापर्यंत 'ड्रॅगन फ्रूट' या नावाने प्रसिद्ध असलेल्या फळाचे नाव बदलले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी