दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० सप्टेंबर २०२०: प्रचंड गदारोळात कृषी विधेयक मंजूर ते PM मोदींचे ट्वीट 

Headlines of the 20 September 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 20 September 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी कृषी विधेयकावरुन आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. परंतु सरकारने हे आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे संसदेने दोन कृषी विधेयके मंजूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय कृषी इतिहासासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. तिसरी महत्त्वाची बातमी देशात मागील २४ तासात तब्बल ११३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या एका दिवसात ९२,६०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५४,००,६२० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे एका ५५ वर्षांच्या महिलेच्या पोटातून ११ किलो वजनाचा ट्युमर काढण्यात आला. हे ऑपरेशन मुंबईत झाले. ट्युमर काढण्यासाठी तब्बल नऊ तास ऑपरेशन करावे लागले. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरने लागला. यावेळी सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबवर अत्यंत रोमांचक असा विजय मिळवला. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. Farm Bill: प्रचंड गदारोळातही कृषी विधेयक झालं मंजूर, राज्यसभेत जबरदस्त हंगामा:  लोकसभेत कृषी विधेयक 2020 (Agriculture Bill 2020) मान्य झाल्यानंतर आज राज्यसभेत (Rajya Sabha) देखील हे विधेयक पारित झालं आहे. पण आज (रविवार) यावेळी चर्चेदरम्यान प्रचंड गोंधळ उडाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. कृषी विधेयक पारित होताच पंतप्रधान मोदींनी केले एका पाठोपाठ एक ट्वीट!: कृषी विधेयकं राज्यसभेत (Rajya Sabha) पारित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी एका पाठोपाठ एक असे अनेक ट्वीट (Tweet) केले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. देशात ५४ लाखांहून अधिक रुग्ण, महाराष्ट्रात काय स्थिती?: देशात मागील २४ तासात जवळजवळ ११३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू (Corona Patient Death)  झाला आहे. देशात काल एका दिवसात ९२ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर: एका ५५ वर्षांच्या महिलेच्या पोटातून ११ किलो वजनाचा ट्युमर काढण्यात आला. हे ऑपरेशन मुंबईत चेंबूरच्या झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. दिल्ली-पंजाबमध्ये अटीतटीचा सामना, सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने मारली बाजी!: रविवारी लीगचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings xi Punjab) यांच्यात खेळला गेला. जो अत्यंत अटीतटीचा झाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी