मुंबई: Top 5 News of the Day 21 February 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक जिल्ह्यांत निर्बंध लावण्यात आले आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. दुसरी बातमी अमरावतीमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत एका आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तिसरी बातमी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने तेथे नाईट कर्फ्यूसह इतर निर्बंध लावण्यात आले आहेत. चौथी बातमी राज्यात आज पुन्ही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाचवी आणि शेवटची बातमी गेल्या सहा महिन्यांत सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.