दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जानेवारी २०२१: सीरम आगीत ५ जणांचा मृत्यू ते सीरमबाबत घातपाताची शंका

Headlines of the 21 January 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • जगभरातील बातम्यांसह राज्यातील घडामोडींवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 21 January 2021: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागली आहे. यामध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग हा एक घातपात आहे का? अशी शंका भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन कोटी लोकांना लस देण्यात येत आहे. आता लवकरच पंतप्रधान आणि काही मुख्यमंत्र्यांना देखील लस टोचली जाणार आहे.

चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंना १५ दिवस क्वारंटाइन न होता घरी जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोना विषाणूमुळे 2020 मध्ये आर्थिक कोंडी झाली. ज्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले. परंतु सर्वेक्षणानुसार 2021 मध्ये नोकऱ्या आणि वेतनवाढ होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतं आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. Serum Institute building Fire : सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, ५ जणांचा मृत्यू; सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. 'सीरमला लागलेली आग हा एक घातपात?', भाजप आमदाराने व्यक्त केली शंका: सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीबाबत  पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांनी असा संशय व्यक्त केला आहे की, 'या आगीमागे घातपाताची शक्यता आहे का?' सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. पाहा पीएम मोदी आणि मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लस कधी दिली जाणार: कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना लसीची लस दिली जाईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. शरद पवारांमुळे टीम इंडियाचे मुंबईकर खेळाडू नाही क्वारंटाइन, गेले थेट घरी: ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच जमीनीवर धूळ चारून घरी परतणाऱ्या भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंना १५ दिवस क्वारंटाइन न होता घरी जाण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. 2021 मध्ये पगार वाढेल, बोनसही मिळेल; नोकर्‍यांमध्ये मोठी वाढ होणार! : 2021 मध्ये बहुतेक कंपन्या वेतनात वाढ करणार आहेत. कारण ६० टक्के कंपन्यांना वेतनवाढ आणि बोनस द्यायचा आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी